Wednesday, August 12, 2015

भक्त पांडुरंगाला विचारतो

एक भक्त पांडुरंगाला विचारतो:
"कंबरेवरचाहात काढून आभाळाला ळव तू
सोन्या चांदीचं दान नको मला, भिजव माझा गाव तू."

त्यावर पांडुरंग हसून म्हणाला :
"भक्ता! आभाळाला हात लाऊन पडेल कसा पाऊस?
आता म्हणतो नको मला सोन्या चांदीचं दान
झाडं सगळी तोडून पृथ्वीवरची, संग कोणी केली घाण?
आता म्हणतो पांडुरंग पाऊस फक्त पाड,
प्रगतीच्या हव्यासापायी रान केलं उजाड!
भक्ता! तुझी "फक्त घेण्याची" वृत्ती आता सोड
चंगळवाद सोडून लाव  निसर्गाची ओढ.
हात जोडून मिटण्यापेक्षा उघड आता डोळे
आई वसुंधरा रडतेय बाळा काढ कानातले बोळे.
पृथ्वीच्या मुलाचं कर्तव्य आत्ताच पार पाड,
जागा करून प्रत्येक माणूस लाव फक्त झाड.
पुढच्या वेळी चालशील जेव्हा पंढरीची वाट
दिसला पाहिजे हिरवागार प्रत्येक डोंगर अन घाट.
अठ्ठावीस युगांपासून विटेवर उभा राहून हाच संदेश देतोय,
पण भोळा भक्त अर्थ न जाणता फक्त प्रसादाच घरी नेतोय!

Sunday, May 10, 2015

काव्यानुभूती

गम्मत अशी आहे, की अनुभव, अनुभूती आणि काव्यानुभूती या तीन शब्दांमध्येच गडबड होत आहे.  श्रावणाचा उल्लेख असेल, कलत्या छायांचा उल्लेख असेल, निळ्यासावळ्या भुईचा उल्लेख असेल, कवीने केलेले हे सर्व उल्लेख आपण अनुभव या सर्वसाधारण शब्दाने घेतो.ती अनुभूती आहे, अनुभव नाही. अनुभव सर्वसामान्यांचा असतो. त्या अनुभवांमध्ये काहीतरी सौंदर्याच्या रहस्याची जाणीव होणे हे अनुभूती चे कार्य आहे. कदाचित तिथूनच कवितेचा प्रांत सुरु होत असावा. आणि ज्या वेळी कवितेच्या अनुभवाचे परमोच्च असे स्थळ किंवा पाझरणीचे जलतीर्थ आपल्याला गवसते त्याला आपण सौन्दर्यानुभूती म्हणतो.अनुभवांपासून प्रराम्भ केला पण तिथेच थांबलात तर कवितेचेलोन्तेच रहस्य आपल्याला कधीच उलगडू शकणार नाही.आणि तिथून हे अम्हला समजत नाही, ते आम्हाला समजत नाही, अशा गोष्टी आपण ऐकतो. सौन्दर्यानुभूतीचा  अर्थ शोधण्याची प्रक्रिया  अर्थ शोधण्याच्या प्रक्रियेपेक्षा संपूर्णपणे भिन्न असल्याने अनुभवाच्या अनुभूतीचे, सौंदर्याचे तुमचे जे काही निकष असतील ते सौन्दर्यानुभूतीला लागू पडत नाहीत. अनुभवाच्या अनुभूतीचे निकष हे तात्कालिक व प्रचारकी असतात. उद्गारवाचक कविता,वक्तृत्वपूर्ण कविता ही संमेलनातील टाळीच्या अपेक्षेने उसळणारी कविता आहे.तिला हे निकष तंतोतंत लागू होतात.

- कवी ग्रेस. 

Sunday, January 26, 2014

आई


आई एक
नाव असतं
घरातल्या घरात
गजबजलेलं
एक गाव असतं !

                  सर्वांत असते
                  तेव्हा
                  जाणवत नाही
                  आता नसली
                  कुठंच
                  तरीही
                  नाही म्हणवत नाही.

जत्रा पांगते
पालं उठतात
पोरक्या
जमिनीत
उमाळे
दाटतात 
आई मनामनात
तशीच
जाते ठेवून काही
जीवाचं जिवालाच 
कलावं
असं
देऊन जाते काही

आई असतो
एक धागा
वातीला उजेड दावणारी
समईतली जागा

घर उजळतं
तेव्हा
तिचं नसतं भान
विझून गेली
अंधारात
की
सैरावैरा धावायलाही
कमी पडतं रान!

पिकं  येतात
जातात
माती मात्र व्याकुळच
तिची कधीच भागत नाही
तहान
दिसत काहीच नसलं
डोळ्यांना 
तरी
खोदत गेलो
खोल खोल
की
सापडतेच अंतःकरणातली
खाण
याहून का निराळी
असते आई ?

ती घरात नाही
तर मग
कुणाशी बोलतात
गोठ्यात
हम्बरणाऱ्या गायी ?

आई खरंच
काय असते ?
लेकराची
माय असते
वासराची
गाय असते
दुधाची
साय असते
लंगड्याचा
पाय असते
धरणीची
ठाय असते !

आई असते
जन्माची शिदोरी
सरतही नाही
उरतही नाही !
आई एक
नाव असतं
नसते तेव्हा
घरातल्या घरात
गल्बललेल गाव असतं !

- फ. मुं. शिंदे.

Thursday, January 16, 2014

उन्हा सारखा हर्ष माझा असावा

उन्हा सारखा हर्ष माझा असावा, घरातून बाहेर यावी मुले
नभा सारखा शोक माझा असावा, तृणातून देखील यावी फुले.

जळा सारखी तृप्ती माझी असावी, स्त्रियांनी कडेचे भरावे घडे
उषे सारखी दीप्ती माझी असावी, फुलावे भविष्यातले केवडे.

भुई सारखी प्रीती माझी असावी, खणी त्याजलाही फुटवे झरे
निशे सारखी शांती माझी असावी, कुशीला विसाव्यास यावी घरे.

तरीही नसावे असोनी जगी ह्या, निरालंब छांदिष्ट वाऱ्यापरी
कळे ना कुणाला कसा पार झालो, भूलावून लोकांस पाऱ्यापरी.

    -बा.भ.बोरकर.

Friday, January 3, 2014

आयुष्याची परिपूर्णता

आयुष्याची परिपूर्णता  


आज म्हटले, आयुष्य विणायला घेऊ या, जमतंय का ते बघू या.
वाटले अगदी सोपं असेल, रंग संगती जमून आली कि आयुष्य ही सुंदर दिसेल.

प्रश्न पडला धागे कोण कोणते घ्यायचे? एक दोनच कि सगळेच वापरायचे?
मग ठरविले फक्त छान छानच धागे घेऊ, एक दोनच काय? सगळेच एकमेकात विणू.

सुरुवात केली वात्सल्याच्या धाग्याने, धागा होता फार उबदार आणि मुलायम.
म्हटले छान आहे हा धागा, धाग्याने वीण ही राहील कायम.

मग घेतला मैत्रीचा धागा, म्हणता म्हणता बर्याच भरल्या जागा.
थोडे थोडे आयुष्य आकार घेऊ लागले, पण अजूनही बरेचसे विणायचे बाकी राहिले.

एक एक धागा आशेचा, सुखाचा आणि आनंदाचा घेतला, प्रत्येक धाग्यात तो आपसूकच गुंतत गेला.
हळू हळू वीण घट्ट होत होती, तरी देखील कसली तरी कमी मात्र होती.

मग घेतला एक नाजुक धागा प्रेमाचा, धागा होता सुंदर आणि रेशमी
धाग्यांनी त्या आयुष्याला अर्थ आला लागुनी.

एक एक घेतला धागा यशाचा, कीर्तीचा आणि अस्तित्वाचा,
 त्यामुळे एक नवा उद्देश्य मिळाला.

सगळेच धागे छान सुंदर आणि प्रसन्न होते
तरी देखील त्यांच्यातल्या एक सारखेपणामुळे मन मात्र खिन्न होते.

थोडे धागे पडले होते निवांत बसून असेच,
 म्हटले बघू या तरी यांच्यामुळे आयुष्य होतंय का सुरेख.

मग घेतला एक धागा दुःखाचा, एक निराशेचा,एक धागा अपयशाचा आणि एक धागा पराजयाचा.
हे चार धागे विणता एकमेकांमध्ये, आयुष्यालात्यांच्यामुळे खरा अर्थ लाभला.

अपयशाशिवाय यश नाही, दुःखाशिवाय सुख नाही
पराजायाशिवाय जय नाही आणि निराशेशिवाय अशा नाही.

महत्व पटले आहे सर्व धाग्यांचे आज मला,
सुंदर सुंदर धाग्यांनीच फक्त आयुष्याला मजा नसते.

सध्या सुध्या लोकरीच्या विणकामात ही रंगसंगती लागतेच.
मग आयुष्य विन्तांनाच का आपल्याला भीती वाटते?

सर्व धागे एकमेकांत विणूनच एक परिपूर्ण आयुष्य बनते.
कुठ्लाध्गा कुठे,कसा वापरायचा हे मात्र ज्याचे त्याच्यावरच असते.
  

Sunday, August 4, 2013

एकच चहा, तो पण

एकच चहा, तो पण कटिंग....
एकच पिक्चर, तो पण ट्याक्स फ्री
एकच साद, ती पण मनापासून
अजून काय हवे असते मित्राकडून?

एकच कटाक्ष, तो पण हळूच...
एकच होकार, तो पण लाजून
एकच स्पर्श, तो पण थरथरून
अजून काय हवे असते प्रियेकडून?

एकच भूताची गोष्ट, ती पण रंगवून
एकच श्रीखंडाची वडी, ती पण अर्धी तोडून
एकच जोरदार धपाटा, तो पण शिवी हासडून
अजुन काय हवे असते आजीकडून?

एकच मायेची थाप, ती पण कुरवाळून
एकच गरम पोळी, ती पण तूप लावून
एकच आशीर्वाद, तो पण डोळ्यांत आसवे आणून
अजून काय हवे असते आईकडून?

एकच कठोर नकार, स्वैराचाराला, तो पण हृदयावर दगड ठेवून
एकच सडेतोड उपदेश, तो पण घोगऱ्या आवाजातून
एक नजर अभिमानाची, ती पण आपली प्रगती पाहून
अजून काय हवे असते वडिलांकडून?

सगळ्यांनी खूप दिले,ते पण न मागून
स्वर्गच जणू मिळाला, तो पण न मागून
फाटकी ही झोळी माझी, ती पण वाहिली भरून
अजून काय हवे मला आयुष्याकडून?


Friday, June 28, 2013

कालनदीच्या पैलावरुनी

कालनदीच्या पैलावरुनी
ऐलावरती घुटमळली घागर
हलली, कलली, डुचमळली पण
निसटून गेली गिळण्या सागर ||

कलती घागर कळण्याआधी
भरुनि घेतली ओंजळ वेगे
ओंजळीतल्या जळात गहिरा
कृष्ण होऊनी सागर रांगे ||

रिती करूनी घागर येथे
निघून गेला कृष्ण खेळीया
भयचकीत मी अन् माझ्यासह
ओंजळीमध्ये प्रश्न- कालिया ||

-ग्रेस