Tuesday, September 18, 2012

कुणी फुलवला मोहोर पिसारा

कुणी फुलवला मोहोर पिसारा
पानगळीच्या वेळी
घडी एक पण ऋतु खेळती
सुखदुःखाची खेळी!

झाले गेले विसरून सोबत
राहण्याचा करू गुन्हा
जगण्याचे विस्कटलेले धागे
चल जुळवू या पुन्हा

जागून घेऊ का सुखाने थोडे
उरलेले दिवस चार ?
मी पचवितो अपयश
तुही गिळावा अहंकार.