Wednesday, August 12, 2015

भक्त पांडुरंगाला विचारतो

एक भक्त पांडुरंगाला विचारतो:
"कंबरेवरचाहात काढून आभाळाला ळव तू
सोन्या चांदीचं दान नको मला, भिजव माझा गाव तू."

त्यावर पांडुरंग हसून म्हणाला :
"भक्ता! आभाळाला हात लाऊन पडेल कसा पाऊस?
आता म्हणतो नको मला सोन्या चांदीचं दान
झाडं सगळी तोडून पृथ्वीवरची, संग कोणी केली घाण?
आता म्हणतो पांडुरंग पाऊस फक्त पाड,
प्रगतीच्या हव्यासापायी रान केलं उजाड!
भक्ता! तुझी "फक्त घेण्याची" वृत्ती आता सोड
चंगळवाद सोडून लाव  निसर्गाची ओढ.
हात जोडून मिटण्यापेक्षा उघड आता डोळे
आई वसुंधरा रडतेय बाळा काढ कानातले बोळे.
पृथ्वीच्या मुलाचं कर्तव्य आत्ताच पार पाड,
जागा करून प्रत्येक माणूस लाव फक्त झाड.
पुढच्या वेळी चालशील जेव्हा पंढरीची वाट
दिसला पाहिजे हिरवागार प्रत्येक डोंगर अन घाट.
अठ्ठावीस युगांपासून विटेवर उभा राहून हाच संदेश देतोय,
पण भोळा भक्त अर्थ न जाणता फक्त प्रसादाच घरी नेतोय!