मैत्री
मैत्री सुखाचा संवाद आहे
कधी रंगणारा वाद ही आहे.
कधी मायेचा स्पर्श हळुवार
कधी रागाचा हक्क ही आहे.
अबोलपणाचा कधी बहाणा
कधी शब्दांचा भडीमार आहे.
नमते घेण्याचा कधी नकार
कधी समंजस स्वीकार आहे.
लढाईच्या
अंतिम क्षणी
संसाराचा
कोष तोडून
सामान्यच
असामान्य होतात
लढाई
जिंकतात,
आणि
पुन्हा कोषात जाऊन
सामान्य
होतात.
विजयाची
मिरवणूक
ते
परस्थपणाने
आपल्या
घराच्या
खिडक्यांतूनच
पाहतात.
********
माणसाच्या
माथ्यावर दारिद्र्यासारखा
शाप नाही,
पृथ्वीच्या
पाठीवर इतके अमंगल
इतके दुःखदायक,
इतके भेसूर
दुसरे
पाप नाही.
********
आकाशतळी
फुललेली
मातीतील एक
कहाणी
क्षण
मावळतीचा येता
डोळ्यात
कशाला पाणी?
******** चिंब चिंब भिजतो आहे भिजता भिजता मातीमध्ये पुन्हा एकदा रुजतो आहे. ******** |
आणि लक्षात ठेव
हा खेळ आहे,
खेळाच्याच नियमांनी
बांधलेला
निर्मळ बिलोरी आनंदात
सांधलेला.
आघात करायचा, पण
रक्त काढायचं नाही
जीव ओतायचा
पण जीवन हरपायचं नाही...
आणि आपल्या अंतरंगातील पंच,
तटस्थ समयसुज्ञ साक्षी
थांबा म्हणतील त्या क्षणी
थांबायचं
आणि जवळ जमलेले
चंद्राचे तुकडे घेऊन
आपापल्या अंधारात विलीन
व्हायचं.
********
उषा सुंदर होतीच
पण अधिक सुंदर आहे
ही संध्या.
मावळतीवर उतरलेला हा
सूर्य,
दिवसभराच्या प्रकाशदानाने
कृतार्थ झालेला
अधिक प्रकाशमय अधिक स्नेहशीलही.
********
शब्द... जीवनाची अपत्ये
मृत्यूपर्यंत पोहोचत
नाहीत.
म्हणून तुझ्या समाधीवर
मी वाहात आहे
माझे मौन.
******** |
ધૂળિયે મારગ
કોણે
કીધું ગરીબ છીએ ? કોણે કીધું રાંક ?
કાં
ભૂલી jaજા મન
રે ભોળા ! આપણા જુદા આંક .
થોડાક
નથી સિક્કા પાસે , થોડીક નથી નોટ
એમાં
તે શું બગડી ગયુ ? એમાં તે શી ખોટ?
ઉપરવાળી
બેંક બેઠી છે આપણી માલંમાલ
આજનું
ખાણું આજ આપે ને કાલ ની વાત કાલ
ધૂળિયે
મારગ કૈંક મળે જો આપણા જેવો સાથ
સુખ
દુઃખોની વારતા કે'તા બાથમાં ભીડી બાથ
ખુલ્લા
ખેતર અડખે -પડખે માથે નીલું આભ,
વચ્ચે
નાનુ ગામડું બેઠું ક્યાં છે આવો લાભ ?
સોનાની
તો સાંકડી ગલી હેતુ ગણતું હેત
દોઢિયા
માટે દોડતા એમાં જીવતાં જોને પ્રેત !
માનવી
ભાળી અમથું અમથું આપણું ફોરે વ્હાલ
નોટ ને સિક્કા નાખ નદીમાં
ધૂળિયે મારગ ચાલ.
-મકરંદ દવે
काही गुजराती शब्दांचे
अर्थ:
खोट = नुकसान ; आपे =
देते ; धुळीये= धुळीचा
बाथ = आलिंगन,भेट; सांकडी
= अरुंद;
हेत = प्रेम, आपलेपणा
;दोढीया = रुपया ;
|
धुळीये मारग
कोणे कीधु गरीब छीये?
कोणे कीधु रांक?
का भूली जा मन रे भोळा!
आपणा जुदा आंक .
थोडाक नथी सिक्का पासे,
थोडीक नथी नोट
एमा ते शु बगडी गयु? एमा
ते शु खोट?
उपरवाळी बँक बेठी छे आपणी
मालम्माल
आजनु खाणु आज आपे ने कालनी वात काल
धुळीये मारग कैंक मळे जो आपणा जेवो साथ
सुख दुःखोनी वारता
के’ता बाथमा भीडी बाथ
खुल्ला खेतर अडखे- पडखे
माथे नीलू आभ
वच्चे नानु गामडू बेठू
छे क्या छे आवो लाभ?
सोनानी तो सांकडी गली
हेतु गणतू हेत
दोढीया माटे दोडता एमा जीवता जो ने प्रेत
मानवी भाळी अमथू अमथु आपणु फोरे व्हाल
नोट ने सिक्का नाख नदींमा
धुळीये मारग चाल
-मकरंद दवे
माटे = साठी ; जो ने =
बघा ना ; भाळी = बघून ;
अमथू = उगाचच ; फोरे=
प्रगटते; व्हाल= प्रेम
नाख= टाक .
|