Wednesday, May 2, 2012

'Outdated' झालंय आयुष्य


'Out dated'  झालंय आयुष्य
 स्वप्नही 'download'  होत नाही
संवेदनांना 'virus'  लागलाय
 दु:खं 'send'  करता येत नाही

 जुने पावसाळे उडून गेलेत
 'delete'  झालेल्या 'file'  सारखे
 अन घर आता शांत असतं
 'range'  नसलेया 'mobile'  सारखे

 'hang'  झालेय 'PC'  सारखी
 मातीची स्थिती वाईट
 जाती माती जोडणारी
 कुठेच नाही 'website'

 एकविसाव्या शतकातली
 पीढी भलतीच 'cute'
 'contact list'  वाढत गेली
 संवाद झाले 'mute'

 'computer'  च्या 'chip'  सारखा
 माणूस मनानं खुजा झालाय
 अन 'mother'  नावाचा 'board',
 त्याच्या आयुष्यातून वजा झालाय

 'floppy Disk Drive' मध्ये
 आता संस्कारांनाच जागा नाही
 अन फाटली मनं सांधणारा
  'internet'  वर धागा नाही

 विज्ञानाच्या गुलामगिरीत
 केवढी मोठी चूक
 रक्ताच्या नात्यांनाही
 आता लागते 'facebook'................

-श्री बबलू वडार, कोल्हापूर 



No comments:

Post a Comment