Tuesday, April 10, 2012

माणसे वाचतांना...

माणसे वाचतांना ,
चष्मा काढून ठेवावा
जुन्या माणसांना भेटतांना नवे व्हावे
नवे पान उलटावे
पुराणा संदर्भ चाळू नये....

माणसे वाचतांना
विरामचिन्हे ऐसपैस पेरावीत.
मोकळे मन आनंदाचे महाद्वार असते.

आपले वाचन, आपणच करावे,
डोळे व कान यांत अंतर स्मरावे.

माणसे वाचतांना अडखळलेलेच बरे.
मुख्य म्हणजे,
पट्टीच्या वाचकानेही ,
आपण देखील माणूस आहोत ,हे विसरू नये.

-दीपा गोवारीकर

No comments:

Post a Comment